सिग्नलवर लहान मुलं खेळणी, कापड, पेन विकताना; भीक मागताना दिसतात. बांधकामाच्या ठिकाणी रेती उचलताना दिसतात. तुम्हीही ही दृश्यं पाहिली असतीलच
भारतात बालकामगार संदर्भात ‘CENSUS’ने २००१मध्ये शेवटचा सर्व्हे केला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक बालमजुरी वाढलेली दिसते. पहिल्या १० राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. मुंबईसारख्या ‘मेट्रो सिटी’मध्ये बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून बालमजुरांचं स्थलांतरण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.......